मुंबईकर अजिंक्य रहाणेने रणजी करंडक स्पर्धेत दमदार शतक झळकावलं. अजिंक्य रहाणेचं प्रथमश्रेणीमधील हे 36 वं शतक आहे सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकाला गवसणी घातली. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या अजिंक्य राहाणेचा आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात समावेश होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या रहाणे खूपच जवळ आहे रहाणेला गेल्या दीड वर्षात एकही शतक झळकावता आलं नव्हतं. त्यानं गेल्या 19 कसोटी सामन्यात 24 च्या सरासरीनं 819 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही रहाणे पूर्णपणे अपयशी ठरला होता.