भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे.. (Photo Credit : manav manglani) अजिंक्य रहाणे मैदानावर आणि मैदानाबाहेर शांत आणि संयमित वर्तनासाठी ओळखला जातो. अजिंक्यसाठी क्रिकेट जितके महत्त्वाचे आहे तितकेच कुटुंब देखील महत्वाचे आहे. अजिंक्य कितीही व्यस्त असला तरी आपल्या मुलांना खूप वेळ देतो. अजिंक्य रहाणेने शाळेत भेटलेल्या राधिका धोपावकरशी लग्न केले. (Photo Credit : manav manglani) दोघांचे लग्न मराठी रितीरिवाजाने पार पडले. रहाणे आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. 2014 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले. लग्नाच्या पाच वर्षांनंतर 5 ऑक्टोबर 2019 मध्ये राधिकानं मुलगी आर्याला जन्म दिला. तर 5 ऑक्टोबर 2022 रोजी राधिकाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. (Photo Credit : manav manglani)