'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री अदा शर्मा रातोरात स्टार झाली आहे.
या सिनेमात तिच्या दोन शेड्स पाहायला मिळत आहेत. दोन्ही शेड्सच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
अदा शर्मा ही मुळची तामिळनाडूची आहे. तिचे वडील भारतीय नौदलामध्ये काम करत असे.
तर तिची आई शास्त्रीय नृत्यांगणा आहे. अदा शर्माला शाळेत असतानाचा अभिनयाची आणि नृत्याची गोडी लागली.
अभ्यासात रस निर्माण न झाल्याने तिने शालेय शिक्षण सोडलं आणि कथ्थकमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
अदा शर्माने 2008 साली '1920' या भयपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
'हसी तो फसी','पुत्र सत्यमूर्ती','क्षणम' आणि 'कमांडो 3' या सिनेमात अदा शर्माच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अदा शर्मा 10 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
अदा शर्माने एक कोटी मानधन घेतलं आहे.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.