मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच उर्मिला कानिटकर कोठारे. मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे तिच्या अभिनयासोबत नृत्यासाठी देखील ओळखली जाते, नेहमीच ती तिचे डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहतेही उर्मिलाच्या या फोटोवर फिदा होत असतात. नुकतेच उर्मिलाने काही कॅज्युअल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत उर्मिला खूपच सुंदर दिसत असून, चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. नुकतेच उर्मिलाने बॉसी लूकमधील एक फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.