‘फुलपाखरू’, ‘दुर्वा’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.



मालिका विश्वातून घराघरांत पोहोचलेल्या हृता दुर्गुळेचा मोठा चाहता वर्ग आहे.



सोशल मीडियावर सक्रिय असणारी हृता नेहमी आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते.



अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



नुकताच हृताने तिचा वाढदिवस साजरा केला. हा दिवस खास बनवण्यासाठी हृता पती प्रतिकसह परदेशी फिरायला गेली होती.



या ट्रीपचे फोटो हृताने आपल्या सोशल मीडियावर शेअर करत, चाहत्यांना या मनमोहक सफरीची झलक दाखवली आहे.



‘दुर्वा’ या मालिकेच्या माध्यमातून हृता दुर्गुळेने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.



तर, ‘फुलपाखरू’ मालिकेने हृताला लोकप्रियता मिळाली.



या मालिकेच्या माध्यमातून हृता घराघरांत पोहोचली.