‘इश्कबाज’मध्ये ‘अनिका’ बनलेली सुरभी चंदना तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.



टीव्हीची अनिका म्हणजेच सुरभी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. तिचे हे फोटो याचा पुरावा आहेत.



सुरभी चंदना जितकी ग्लॅमरस आहे, तितकीच तिने तिच्या ‘डाउन टू अर्थ’ स्वभावाने लोकांची मने जिंकली आहेत.



सुरभी चंदना दशकभरापासून टीव्ही इंडस्ट्रीत आहे. गेल्या काही वर्षांत, अभिनेत्रीने अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केलेय.



सुरभी चंदना ‘नागिन 5’मध्ये दिसली, तेव्हा तिला पाहून सर्वच चाहते घायाळ झाले. लूकपासून अभिनयापर्यंत सुरभीने या पात्रासाठी खूप काळजी घेतली होती.



‘नागिन 5’मधील शरद मल्होत्रासोबत सुरभी चंदनाची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली होती. (Photo : @officialsurbhic/IG)