हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याला 'किंग रिचर्ड्स' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याच सोहळ्यात तो होस्ट ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानेही चर्चेत आला. ख्रिस रॉकने विलची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची तिच्या टक्कलपणाबद्दल थट्टा केली होती. 1987 मध्ये स्मिथचा पहिला अल्बम 'रॉक द हाऊस' खूप हिट ठरला. अल्बमने स्मिथला 18 वर्षांपेक्षा कमी वयात रातोरात कोट्यधीश बनवले. डीजे जॅझी जेफ आणि फ्रेश प्रिन्स यांनी मिळून अनेक हिट अल्बम आणि गाणी तयार केली आहेत. 1988 मध्ये 'पॅरेंट्स जस्ट डोन्ट अंडरस्टँड'साठी त्याला पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. आता त्याच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती.