‘पार्वती’ बनून अभिनेत्री साक्षी तन्वरने चाहत्यांच्या हृदयात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. टीव्हीवर आपल्या अभिनायचा जलवा दाखवल्यानंतर, साक्षीने मोठ्या पडद्यावरही कमाल केली आहे. (PC: sakshitanwarworld/IG)



‘दंगल’सारख्या चित्रपटात झळकलेली साक्षी फिटनेस आणि फॅशनसेन्समुळेही खूप चर्चेत असते. (PC: sakshitanwarworld/IG)



साक्षीच्या साध्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ती 49 वर्षांची आहे, याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण होते. साक्षी अनेकदा फक्त साडी नेसणे पसंत करते. (PC: sakshitanwarworld/IG)



फॅशन आणि एथनिक वेअर साक्षीला नेहमीच आवडतात. अनेक पार्ट्यांमध्येही ती साडीच परिधान करते. विशेष बाब म्हणजे अभिनेत्री बनारसी साडीपासून जॉर्जेट साडीपर्यंत सर्व प्रकारच्या साड्या नेहमीच सुंदरपणे कॅरी करते. (PC: sakshitanwarworld/IG)



साडीमध्ये ती नेहमीच हलका मेकअप आणि साधे दागिने परिधान करते, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसते. (PC: sakshitanwarworld/IG)



तुम्हालाही साड्यांची आवड असेल, तर तुम्ही साक्षी तन्वरच्या साडी कलेक्शनची कॉपी देखील करू शकता, यामुळे तुम्ही खूप स्टायलिश आणि खास दिसाल. (PC: sakshitanwarworld/IG)