आई कुठे काय करते मालिकेतली संजना ही व्यक्तिरेखा नेहमी चर्चेत असते. खलनायिका असली तरी ती प्रेक्षकांची लाडकी आहे. रुपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिला येणारे अनुभव , प्रेक्षकांचं प्रेम याबद्दलच्या अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे. नुकताच रुपालीचा एक खास लूक समोर आलाय, ज्यात ती ट्रॅडिशनल अवतारात दिसत आहे.