टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या माध्यमातून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



ती तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे लोकांमध्ये खूपच चर्चेत असते.



बिग बॉसनंतर रुबिना पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.



ती लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये दिसणार आहे.



‘खतरों के खिलाडी’साठी ती खूप उत्सुक आहे.



यादरम्यान रुबिना म्हणाली की, तिने तिच्या आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे, ज्यामुळे ती आता अधिक मजबूत झाली आहे.



नुकतेच या शोच्या सेटवर तिने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.



या गुलाबी ड्रेसमध्ये रुबिना दिलैक खूप सुंदर दिसत आहे. तिने या निसर्गरम्य परिसरात सुंदर फोटोशूट केले आहे.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुबिना दिलीक 'खतरों के खिलाडी 12'चा भाग बनणार आहे. याआधी रुबिना ‘बिग बॉस 14’ची विजेती देखील ठरली होती.



स्टाईल आणि फॅशनमुळे ती लोकांमध्ये खूपच चर्चेत असते.