बॉलिवूड चित्रपट 'यारियां'मध्ये झळकलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
नुकतेच रकुलप्रीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एका मल्टीकलर ड्रेसमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
रकुल प्रीत सिंह कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंग करत होती. 2009 मध्ये रकुलने ‘गिली’ या कन्नड चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.
एका मुलाखतीत रकुलने सांगितले होते की, तिने पॉकेटमनीसाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.
जेव्हा रकुलने काही चित्रपटांमध्ये काम करून चांगले पैसे कमावले, तेव्हा तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि कॉलेजमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर रकुलने चित्रपटांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 2011मध्ये तिने सिद्धार्थ राजकुमारसोबत तेलुगू चित्रपट 'केरातम'मध्ये काम केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने तमिळ चित्रपट ‘थडियारा ठका’मध्ये सहाय्यक भूमिका केली.
रकुल प्रीत सिंह लवकरच ‘अटॅक’, ‘रनवे 34’, ‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.