कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाच्या 3 महिन्यांनंतर आता नोंदणीपद्धतीने लग्न केले आहे. कतरिना-विकी गेल्या वर्षी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकले होते. कतरिना आणि विकी 19 मार्च (शनिवार) रोजी मुंबईतील कोर्टात पोहोचले, त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाची नोंदणी केली लग्नाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या जोडप्याने कुटुंबासोबत रेस्तराँमध्ये जाऊन नोंदणीकृत विवाह साजरा केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अलीकडेच कतरिना आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. ज्यामध्ये हे कपल फॅमिलीसोबत दिसले होते.