अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर बिनधास्त बोल बोलणारी ही अभिनेत्री सर्वांचीच लाडकी आहे. नुकतीच हेमांगी कवी ताज हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी तिने आपल्या आयुष्यातले हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. यावेळी तिने काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला होता. याच दरम्यान तिने एक झक्कास फोटोशूट देखील केले आहे. ताज हॉटेलच्या जिन्यावर बसून तिने हे फोटोशूट केले आहे. पांढरा शर्ट आणि डेनिममध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे हेमांगी कवीचे हे सुंदर फोटो तिच्या पतीने क्लिक केले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून लाईक्सचा वर्षाव केला आहे. नुकताच हेमांगी कवीचा वाढदिवस झाला, याच खास निमित्ताने तिने ताज हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेतला. हेमांगी कवी नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते आणि आपली मतं बेधडकपणे व्यक्त करत असते. (Photo:@hemangiikavi/IG)