छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.



या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिने ‘अंतरा’ हे पात्र साकारले आहे.



‘जीव माझा गुंतला...’ या मालिकेची सध्या छोट्या पडद्यावर हवा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.



सध्या सगळीकडे मंगळागौर साजरी करण्याची तयारी सुरु आहे. यातच मराठी मालिका देखील सामील झाल्या आहेत.



मराठी मालिकांमध्ये देखील सध्या मंगळागौरचा माहोल पाहायला मिळत आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत यंदा अंतराची पहिली मंगळागौर साजरी केली गेली आहे.



याच निमित्ताने अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.



योगिता चव्हाण हिने तिचे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.



या फोटोशूटमध्ये ती पारंपारिक वेशात दिसत आहे.



नऊवारी साडी आणि दागिन्यांमध्ये योगिता खूप सुंदर दिसत आहे.