अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गुढीपाडव्या निमित्ताने प्रियाने खास फोटोशूट केले. प्रियाने हिरव्या रंगातील नऊवारी साडी परिधान केली आहे. या फोटोमध्ये प्रिया पारंपरीक मराठी लूकमध्ये दिसत आहे. प्रियाने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियाच्या मराठमोळ्या लूकवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. या आधीदेखील प्रियाच्या खणाच्या साडीतील लूकने चाहत्यांना घायाळ केले होते. खास ईअर रिंग आणि साडीला मॅचिंग पर्स असा प्रियाचा लूक होता. 'या सुखांनो या' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. प्रियाने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे.