रेणुका शहाणेने गुढीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमांगी कवीने मराठमोळ्या लुकमधील गुढीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वानंदी टिकेकरने गुढीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीने गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या मधुराणीने गुढीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. गौतमी देशपांडेने गुढी पाडवा आणि नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रवी जाधनने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'हृदयी प्रीत जागते' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या सिद्धार्थने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल देशपांडे यांनी कुटुंबियांसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे. गुढीसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दोन्ही मुलं आणि गुढीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.