अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या व्हेकेशन मूडवर आहे. सुमोना सध्या फुकेतमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर बिकिनीवरील फोटो शेअर केले आहेत. बिग हॅटसह तिने स्विमिंग पूलजवळ पोझ देत फोटो काढले. अभिनेत्रीचा हा किलर लूक लोकांना खूप आवडला आहे. कपिलने हा लूक पाहिला असता तर त्याने तुझी टिंगल उडवली नसती असे एकाने म्हटले. समुद्र किनारी ब्लॅक अॅण्ड व्हाईट बिकनीत सुमोनाने फोटो पोस्ट केला होता. बिकिनीतील या फोटोने सोशल मीडियाचा पारा वाढवला होता. सुमोनाने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.