अक्षया-हार्दिकने लग्नानंतर पहिला पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. अक्षया-हार्दिकने पुण्यातील राहत्या घरी गुढी उभारली आहे. पारंपरिक पद्धतीने पुढीपाडवा साजरा केल्यानंतर अक्षया-हार्दिकने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. अक्षया-हार्दिकने फोटो शेअर करत 'पहिला पाडवा', असं कॅप्शन लिहिलं आहे. अक्षया-हार्दिकचे गुढीसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिल्या गुढीपाडव्यासाठी अक्षया-हार्दिकने पारंपरिक लुक केला होता. अक्षया-हार्दिक 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. डिसेंबर 2022 मध्ये अक्षया-हार्दिक लग्नबंधनात अडकले आहेत. अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अक्षया आणि हार्दिकची जोडी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.