हिना खानने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022’मधील तिच्या नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत. हिना कान्समध्ये आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे. नुकतेच तिने काही लाल शोल्डरलेस गाऊन ड्रेसचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हिना खान फ्रेंच रिव्हिएराजवळ वेगवेगळ्या फोटो पोज देताना दिसत आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करते आहे. हिना खान तिच्या आगामी इंडो-इंग्रजी चित्रपट 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' च्या पोस्टर लाँचसाठी कान्सच्या रेड कार्पेटवर हजर झाली आहे. हिना खानने डिझायनर रामी अल अलीने डिझाइन केलेला गडद लाल रंगाचा स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केलेला आहे. यासोबत तिने मिसमॅच कानातले परिधान केले आहेत. हिना खानचे मोकळे केस वाऱ्याच्या झोताने उडत आहेत. हिनाने लिपस्टिकसाठी हलकी शेड निवडली आहे. याआधी तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या 'लाइन्स' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यासाठी हजेरी लावली होती.