वरुण धवनच्या कुटुंबामध्ये नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तो पुन्हा एकदा काका झाला आहे. वरूणच्या भावाला म्हणजेच रोहित धवनला मुलगा झाला आहे. रोहित धवन हा चित्रपट निर्माता आहे. मार्च महिन्यामध्ये वरुणची पत्नी नताशानं रोहित धवनच्या पत्नीसाठी म्हणजेच जाह्नवीसाठी बेबी शॉवर पार्टीचं आयोजन केलं होतं. जाह्नवी आणि रोहितनं सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि जाह्नवीला एक मुलगी आहे. रोहितच्या मुलीचं नाव नाव नियारा असं आहे. वरुण नियारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. देसी बॉइज या चित्रपटाचे दिग्दर्शन वरूणच्या भावानं म्हणजेच रोहित धवननं केलं आहे. वरुणच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत असतात.