बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय म्हणजे, लाखो दिलांची धडकन. टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर, मौनी बॉलिवूडकडे वळली. अभिनेत्री मौनी रॉयनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं बॉलिवूडमध्येही स्वत:ला सिद्ध केलं. मौनीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. सध्या मौनीचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मौनीनं ग्रीन बॅकलेस ड्रेसमध्ये दिसून येतेय. बॅकलेस ड्रेसमध्ये मौनी रॉय अत्यंत ग्लॅमरस दिसतेय. आपला लूक पूर्ण करण्यासाठी मौनीनं ब्लॅक गॉगलही वेअर केलाय. बऱ्याच दिवसांपासून मौनी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आगामी काळात 'माया जाला' या सिंहली चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटातून ती सिंहली इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.