स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या चाहत्यांची खूप लाडकी आई बनली आहे.



सोशल मीडियावर सक्रिय असणारी मधुराणी आपल्या पोस्ट आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते.



नुकतेच मधुराणी प्रभुलकरने तिचे नवे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.



या फोटोत लाडक्या आईचं सुंदर रूप पाहून चाहते देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.



‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून, या फोटोमधील मधुराणीच्या गालावरील खळीने अनेकांचे लक्ष वेधले.



मधुराणी मालिकेत मोठी वाटत असली, तरी ती वयाने फार मोठी नाहीये.



मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असते.