‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये ‘गौरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.



‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती, अनिरुद्ध, अभिषेक यांच्याप्रमाणे गौरीनेही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.



तिने नुकतेच एक हटके फोटोशूट केले आहे.



यामध्ये तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.



बनारसी साडी एका वेगळ्या पद्धतीने नेसून तिने एक सुंदर लूक तयार केला आहे. यात ती शोभून दिसत आहे.



उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गौरी कुलकर्णी विशेष लोकप्रिय आहे.



गौरी सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, ती नेहमीच तिचे फोटो चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.



काही दिवसापूर्वीच गौरीने एक फोटोशूट केलं असून, हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या फोटोंमधील गौरीचा मनमोहक अंदाज पाहून चाहते तिच्या लूकवरून नजर हटवू शकत नाहीयेत.



बनारसी साडी एका वेगळ्या पद्धतीने नेसून तिने एक सुंदर लूक तयार केला आहे.