आज सर्वत्र गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला.



या जल्लोषात कलाकार मागे राहतील ते बरं कसे.. कलाकारांनी आपल्या वेगवेगळ्या अंदाजात कृष्णजन्माष्टमी साजरी केली.



यातच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चक्क कृष्णाचा अवतार धारण करत खास फोटोशूट केले आहे.



कृष्णाच्या रंगात रंगलेली ही अभिनेत्री आहे प्रेक्षकांची लाडकी ‘शेवंता’ म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.



‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



दर वेळी अपूर्व एखाद्या हटके पद्धतीने सण साजरे करत असते. यावेळेस देखील तिने अशीच एक खास पद्धत निवडली आहे.



चेहऱ्यावर कृष्णाचा मेकअप करून अपूर्वाने सुंदर फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.



अपूर्वा नेमळेकारच्या या सुंदर फोटोंवरून चाहत्यांची नजरही हटत नाहीये. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.