अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या क्लासी अंदाजानं चाहत्यांना भूरळ पाडतेच. पण याबाबतीत जान्हवीची लहान बहिण खुशी कपूर भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकते. खुशी कपूरनं आपले काही क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सोशल मीडियावर खुशीचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. खुशीच्या फोटोंवरही चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो. खुशी लेटेस्ट फोटोंमध्ये पर्पल कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसून येतेय. जर तुम्हाला न्यू ईयर पार्टीमध्ये हटके दिसायचं असेल, तर तुम्ही खुशीचा हा लूक ट्राय करू शकता. खुशीचा हा बोल्ड आणि क्लासी अंदाज चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतोय बोल्ड लूकमधील घायाळ करणाऱ्या अदांनी खुशीनं चाहत्यांना घायाळ केलंय आपल्या बॅकलेस आऊटफिट्समध्ये खुशी परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करतेय खुशी कपूर म्हणजे, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी लवकरच जोया अख्तर दिग्दर्शित 'आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.