‘फुलपाखरू’ अन् ‘दिपू’ बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच ‘अनन्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आज (12 सप्टेंबर) हृता दुर्गुळे तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
हृता दुर्गुळेचा जन्म 12 सप्टेंबर 1990 रोजी मुंबईतील दादर येथे झाला.
हृताने आयईएससीएन सुले गुरुजी इंग्लिश मीडियम हायस्कूल या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
हृता दुर्गुळेने तिचे शिक्षण मुंबईतल्या रामनारायण रुईया कॉलेजमधून पूर्ण केले आहे. याशिवाय तिने मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.
कॉलेजमध्ये असताना हृता वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची. इथूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.
2013मध्ये ‘दुर्वा’ या मालिकेतून हृताने मालिका विश्वात एन्ट्री घेतली. त्यानंतर, ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमधून तिने चाहत्यांच्या मनावर गारुड केलं.
नुकतीच हृता दिग्दर्शक-निर्माता प्रतिक शहासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
‘दुर्वा’ या मालिकेच्या माध्यमातून हृता दुर्गुळेने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. तर, ‘फुलपाखरू’ मालिकेने हृताला लोकप्रियता मिळाली.