‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात येणारी अभिनेत्री एव्हलिन शर्मा आज (12 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे.



एव्हलिन शर्माचा जन्म 12 जुलै 1986 रोजी फ्रँकफोर्ट, जर्मनी येथे झाला.



एव्हलिन शर्माने बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे.



एव्हलिन शर्माचे वडील भारतीय आणि आई जर्मन आहे. त्यामुळे जवळपास आठ भाषांवर अभिनेत्रीचे चांगले प्रभुत्व आहे.



इंग्रजी, जर्मन, हिंदी, स्पॅनिश, थाई, फिलिपिनो, फ्रेंच आणि डच या भाष देखील ती बोलते.



तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते.



एव्हलिनने अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. अयान मुखर्जीच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातून तिला चांगलीच पसंती मिळाली होती.



या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत काही काळ रोमान्स करताना दिसली होती.