रुपेरी पडद्यावरील अभिनय आणि सौंदर्याने दिया मिर्झाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. अभिनेत्री दिया मिर्झा आता व्यवसायात उतरली आहे. बिझनेस वूमन दिया मिर्झाने बेबी केअर प्रोडक्ट बेबीचक्र (BabyChakra) मध्ये गुंतवणूक केली आहे. बेबीचक्र ही एक स्टार्टअप कंपनी असून 'गुड ग्लॅम ग्रुप'चा भाग आहे. बाळाची काळजी आणि पालकत्वाशी संबंधित उत्पादने बनवते. ई-कॉमर्स साईटवरून कंपनी उत्पादनांची विक्री करते. दिया मिर्झाने किती गुंतवणूक केली आहे, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. दिया मिर्झाने तिच्या आयुष्यात आलेले बदल आणि आई झाल्यानंतरचे अनुभव शेअर केलेत. या नव्या व्यावसायिक भागिदारीमुळे आनंदी असल्याचे दिया मिर्झाने म्हटले.