आज 1 ऑक्टोबर... एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.

आज एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आलीये.

19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमती 209 रुपयांनी वाढ करण्यात आलीये.

आजही घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती मात्र स्थिरच आहेत.

14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडर आता 1,731.50 रुपयांना मिळणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी 1684 रुपये आकारले जातील.

यापूर्वी 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींत 157 रुपयांनी कपात करण्यात आली होती

30 ऑगस्ट रोजी सरकारनं 14.2 किलोच्या LPG सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला.

उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध एलपीजी गॅस सबसिडी देखील 400 रुपये करण्यात आलीये