छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगावकर अल्पावधीत घराघरात प्रसिद्ध झाली.
धनश्री ‘वहिनीसाहेब’ याच नावाने ओळखली जाते.
काही दिवसांपूर्वी धनश्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
सध्या धनश्री तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे.
बाळंतपणानंतर धनश्रीने फिटनेसकडे जास्त लक्ष दिल्याचं या फोटोंमधून दिसून येतंय.