'पवित्र रिश्ता' मधून नावारुपाला आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे अंकिता सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. आताही तिने थोडं वेगळं फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती शॉर्ट हेअरमध्ये दिसत आहे. एक वनपीस ड्रेसमध्ये अंकिता फोटोंत दिसत आहे. ती फोटोंमध्ये अजब पोज देताना दिसत आहे. त्यामुळे या फोटोंची चर्चा होत आहे. ती काही काळापूर्वीच विकी जैनसोबत विवाह-बंधनात अडकली. ती विकीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अंकिता लोखंडे 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. अंकिता आणि विकीने मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केलं होतं.