अभिनेत्री रिचा चड्ढा ही तिच्या ट्वीटमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
सध्या रिचा तिच्या एका ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं.
उपेंद्र द्विवेदी यांच्या या ट्वीटला रिप्लाय करत रिचानं लिहिलं,‘गलवानने HI म्हटलंय’.
रिचानं केलेल्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं केला आहे, असा आरोप काही नेटकरी तिच्यावर करत आहेत.
आता रिचानं या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
रिचानं एक ट्वीट शेअर करुन माफी मागितली आहे.
'मला कोणाला दुखवायचे नव्हते. मी ट्वीटमध्ये लिहिलेल्या तीन शब्दांनी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांनी माफी मागते.', असं रिचानं ट्वीटमध्ये लिहिलं.
'हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे.' असंही रिचानं ट्वीटमध्ये लिहिलं.