डब्लूडब्लूडब्लू चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आलीय. डब्लूडब्लूईचे सुपरस्टार स्कॉट हॉल यांचं निधन झालंय. (Photo Credit: WWE)



वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. (Photo Credit: WWE)



स्कॉट हॉल यांना काही वेळापूर्वी हिप इंजरी झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती सतत खराब होत गेली. (Photo Credit: WWE)



स्कॉट हॉल हे गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. स्कॉट यांना तीन हार्ट अॅटक आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Photo Credit: WWE)



स्कॉट हॉलची गणना डब्लूडब्लूईमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारमध्ये केली जाते. (Photo Credit: WWE)



त्यांनी डब्लूडब्लूई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे दोन खिताब जिंकले होते. (Photo Credit: WWE)



स्कॉट हॉलनं यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1958 रोजी अमेरिकेत झाला. त्यांनी 1984 मध्ये पहिला रेसलिंग सामना खेळला होता. (Photo Credit: WWE)



1991 मध्ये ते वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सामील झाले. रिंगमध्ये त्यांना 'रेझर रेमन' म्हणून ओळखला जात होते. (Photo Credit: WWE)



त्यांनी 1995 मध्ये समरस्लॅम आणि रेसलमेनिया येथे स्कॉट हॉलच्या केविन नॅश, ब्रेट हार्ट, शॉन मायकेल्ससह अनेक मोठ्या डब्लूडब्लू स्टार खेळाडूंशी स्पर्धा केली. (Photo Credit: WWE)