धकाधकीची जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. अॅसिडीटीनं तर अनेकजण हैराण होतात.

अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक औषधांचा आधार घेतला जातो. त्याऐवजी काही घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरतात.

अॅसिडीटीमुळे पोटातील जळजळ आणि पोटदुखी दूर करण्यासाठी थंड दूध प्या.

अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर बडिशोपचं पाणी प्या.

कलिंगडातील पोषक तत्वं अॅसिडीटी दूर करण्यास मदत करतात.

जिरं आणि जिऱ्याची पावडरचा आहारात समावेश करा आणि अॅसिडीटीपासून सुटका मिळवा.

अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी गुळही फायदेशीर ठरतो.

पोटाच्या कोणत्याही समस्येवर ओवा अत्यंत गुणकारी ठरतो.

अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यासाठी रोज सकाळी 1 आवळा खा.