अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात. 'आठवा रंग प्रेमाचा' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रिंकूनं या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली. रिंकूनं 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टला तिनं कॅप्शन दिलं, 'तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू...'कृतिका'च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू. टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!' चित्रपटामध्ये रिंकू कृतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती राकेश राऊत आणि समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केले आहे. 17 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सैराट चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली.