भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.

लतादीदींच्या जाण्याने बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावर लतादीदींबरोबर फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

लतादीदींची गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. त्यांनी अनेक भाषांमध्ये जवळपास 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

अनेक बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या चित्रपटांच्या गाण्यांना लतादीदींनी आपला आवाज दिला आहे.

लतादीदींच्या निधनाने 'शतकांचा आवाज हरपला', अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला.

लतादीदींची आठवण म्हणून त्यांची अजरामर गाणी कायम आपल्या स्मरणात राहतील. हीच खरी त्यांना आदरांजली असेल.

लतादीदींच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिला आठवणींना उजाळा!

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले.

वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.