वाघांना वाचवण्याची योजना 'प्रोजेक्ट टायगर' ला पन्नास वर्षे झाली. 2006 पासून भारतात वाघांची गणना केली जाते. सध्या भारतात 3 हजारहून अधिक वाघ असल्याचे सांगितले जाते. मध्य प्रदेशातील जंगलात सर्वाधिक वाघ आढळतात. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण चार वर्षातून एकदा वाघांची गणना करते. या गणनेसाठी भारताची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' ने घेतली आहे. गणनेसाठी 5 लाख 22 हजार किलोमीटर फूट सर्वेक्षण करण्यात आले. या गणने दरम्यान जंगलामध्ये 26 हजार जागेंवर कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यांनी वाघांचे 76 हजार छायाचित्रे घेतली या छायाचित्रांच्या माध्यमातून पट्टेरी वाघांना विशेष ओळख देण्यात आली.