हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये जैन मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु आहे.

या खोदकामादरम्यान भगवान कुंथुनाथ यांची मूर्ती आढळून आली.

कुंथुनाथ भगवान हे जैन धर्मीयांच्या 24 तीर्थंकरांपैकी एक आहेत.

ही मूर्ती सुमारे तेराशे वर्ष जुनी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहेत.

औंढा नागनाथ शहरातील जैन मंदिराच्या शेजारील जागेत हे खोदकाम सुरु होते.

यावेळी कुंथुनाथ भगवान यांची मूर्ती या ठिकाणी खोदकामात आढळून आली आहे.

यावेळी कुंथुनाथ भगवान यांची मूर्ती या ठिकाणी खोदकामात आढळून आली आहे.

कुंथुनाथ भगवान यांच्या या मूर्तीची उंची सव्वा पाच फूट आहे.

ही मूर्ती 1300 ते 1600 वर्ष जुनी असल्याचा दावा येथील जैन मंदिराचे अध्यक्ष तेजकुमार झांजरी यांनी केला आहे

जैन मुनींच्या मार्गदर्शनानंतरच या मूर्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असं तेजकुमार झांझरी यांनी सांगितलं.