Narcos ही वेब सीरिज क्राइम थ्रिलर आहे. ही वेब सीरिज तुम्ही वीकेंडला पाहू शकता. ब्लॅक मिरर ही वेब सीरिज 2011 मध्ये रिलीज झाली ही थ्रिलर वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर घरबसल्या पाहू शकता. स्ट्रेंजर थिंग्स ही वेब सीरिज 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पीकी ब्लाइंडर्स ही एका गँगस्टरची कथा आहे. डार्क या वेब सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं आहे. दोन मुलं हरवल्यानंतर काय घडतं? हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. हाऊस ऑफ कार्ड्स ही सीरिज पॉलिटिकल ड्रामावर आधारित आहे. या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हार्टस्टोपर या वेब सीरिजमध्ये दोन मुलांची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. डेयरडेविल्स या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. द क्राउन ही वेब सीरिज क्वीन एलिजाबेथ यांच्या जीवनावर आधारित आहे. Ozark या वेब सीरिजमध्ये एका फायनेंशियल अॅडव्हाइजरची गोष्ट दाखवण्यात आली आहे.