सनी देओल आणि अमीषा पटेल सध्या त्यांच्या आगामी 'गदर 2' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सनी देओल आणि गदर-2 च्या टीमनं नुकतीच अटारी बोर्डरवरील जवानांची भेट घेतली. अटारी बोर्डरवर येथील कार्यक्रमाला बऱ्याच लोकांनी हजेरी लावली होती. सनी देओलनं अटारी बोर्डरवरील जवानांसोबत काढलेले फोटो शेअर केले आहेत. सनी देओलनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'अटारी बॉर्डरवर रिट्रीट सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान मिळाला' अभिनेत्री अमिषा पटेलनं देखील अटारी बोर्डरवरील फोटो शेअर केले आहेत. गायक उदित नारायण हे देखील सनी देओलसोबत अटारी बोर्डरवर गेले होते. सनीनं अटारी बोर्डरवरील फोटो शेअर करुन लिहिलं, 'येथील एनर्जी आणि उत्साह आवडला' अटारी बोर्डरवरील जवानांसोबत अमिषा आणि सनी देओल यांनी फोटो काढले. अमिषा आणि सनी देओल यांच्या गदर-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.