प्रथिनांनी युक्त कॉटेज चीज आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कॉटेज चीजमध्ये असलेले पोटॅशियम देखील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि सोडियमचा प्रभाव संतुलित करते,
मोजरेला चीज हे कमी फॅटयुक्त चीज आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मोजरेला चीज आवश्यक आहे.
मोजरेला चीजमध्ये असलेले कॅल्शियम हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
रिकोटामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रिकोटामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित करून हृदय निरोगी करते.
फेटा चीजमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
फेटा चीज कॅल्शियमचा एक चांगला स्रोत, जो निरोगी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.