वसई : वसईतील चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2018 10:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. जवळपास २०० हून अधिक पर्यटक इथं आले होते. सततच्या पावसानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि अनेक ठिकाणी पर्यटक अडकून पडले. यातील १०० पर्यटक सुखरुप बाहेर पडले आहेत. तर बेपत्ता असलेल्या ५ पर्यटकांचा हेलिकॉप्टरने शोध घेऊन त्यांनाही बाहेर काढण्यात आलं आहे. आताही १५ ते २० पर्यटक एका खडकावर अडकले असल्याची माहिती तहसीलदारांनी दिलीय. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनड़ीआरएफची टीम दाखल झाली असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, एका पर्यटकांचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.