Sandeep Deshpande : मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?
Amit Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत.यामध्येच सोमवारी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची मुंबईतील राजगड कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपल्याला लोकांसाठी जर काही करायचं असेल तर स्वतः संसदीय राजकारणात यायला हवं असं मनसे नेते आणि सरचिटणीस यांना सांगत मी देखील विधानसभेसाठी तयार आहे अशी तयारी दर्शवली. त्यामुळे आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात येणार या चर्चांना आणि त्यांनी यावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी होऊ लागलीये.