उल्हासनगर : झटपट श्रीमंत होण्यासाठी 100 रुपयाच्या नोटेची कलर प्रिंट, दोन जण अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उल्हासनगरमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिता मलानी आणि राकेश इसरानी, अशी या दोघांची नावं आहेत. यापैकी राकेश हा त्याच्या घरी खोट्या नोटा तयार करत होता. तर मिता या नोटा कमिशनवर विकत घेऊन चलनात आणत होती. हलक्या कागदावर 100 रुपयांच्या नोटेची कलर प्रिंट काढून त्या चिकटवण्यात येत होत्या. आरोपींनी याचं प्रात्यक्षिक दाखवल्यावर पोलीस सुद्धा थक्क झाले. या कारवाईत 45 हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.