ठाणे : लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा हात तुटला
Continues below advertisement
लिप्टमध्ये शिरताना किंवा बाहेर पडताना काळजी घेतली नाही, तर काय घडू शकतं याचं उदाहरण ठाण्यात समोर आलं आहे.
कारण लिफ्टच्या दरवाजात हात अडकून एका 8 वर्षांच्या मुलीला आपला हात कायमचा गमवावा लागल्याची घटना ठाण्याच्या कासारवडवलीमध्ये घडली आहे. अर्चना थळे, असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी अर्चना शिकवणीसाठी गेली होती. त्यावेळी तळमजल्यावर पडलेला पेन घेण्यासाठी अर्चना लिफ्टमधून खाली गेली. परत आल्यानंतर अर्चनाचं चप्पल लिफ्टमध्येच राहिलं. ते घेण्यासाठी तिने लिफ्टमध्ये हात घातला आणि त्याचवेळी लिफ्टचा दरवाजा बंद झाला. अर्चनाचा हात चक्क कोपरापासून तुटला. त्यामुळे तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान लिफ्टमध्ये कर्मचारी नसल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप अर्चनाच्या परिवाराने केला आहे.