Indian Cricket New Coach: राहुल द्रविड भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. बीबीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने बुधवारी भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या नियुक्तीला एकमताने मंजुरी दिली. द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.