Tokyo Olympics 2020 : मनु भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

Continues below advertisement

भारतीय नेमबाजांकडून ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा निराशा झालीय. १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर-सौरभ चौधरी जोडीला अपयश आलंय. दुसरीकडे नेमबाजीतील या अपयशाला प्रशिक्षकाला जबाबदार धरणार असल्याचे भारतीय शूटिंग महासंघाचे अध्यक्ष रणधीरसिंग यांनी म्हटलंय. भारतीय नेमबाजांनी पूर्ण क्षमतेने खेळ केलाय. मात्र प्रशिक्षकांच्या कामगिरीचं पोस्टमार्टम करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. मनू भाकर आणि तिचा माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यावर रणिणदर सिंग यांचा रोख होता. कोविडमुळे जपान ऑलिम्पिकसाठी मर्यादित कोटा असल्यानं जसपाल राणाला जपानला येता आलं नाही. त्यामुळे दिल्लीतील वर्ल्डकपनंतर रौनक पंडितनं मनूच्या कोचची भूमिका बजावली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram