Tokyo Olympic 2020 : खूशखबर! भारतीय महिला हाॅकी संघाकडून दक्षिण अफ्रिकेचा 4 -3 ने पराभव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं शानदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेला 4-3 नं नमवत भारतीय महिला संघानं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. भारताच्या वंदना कटारियानं शानदार खेळी करत गोलची हॅटट्रिक करण्याचा विक्रम केला. भारतानं याआधीच्या सामन्यात शुक्रवारी आयर्लंडला हरवलं होतं. भारतीय महिला हॉकी टीमच्या या विजयासह क्वार्टर फायनलच्या आशा जीवंत आहेत. मात्र आता भारताला आज सायंकाळच्या सामन्यात आयर्लंडच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघानं सामन्याची चांगली सुरुवात करत पहिल्या काही मिनिटातच गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात दक्षिण आफ्रिकेनं एक गोल करत बरोबरी केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं पुन्हा एक गोल करत आघाडी घेतली. मात्र पुन्हा दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या क्षणात गोल करत बरोबरी केली. त्यानंतर भारतीय संघानं पुन्हा तिसरा गोल करत आघाडी घेतली मात्र याच क्वार्टरमध्ये आफ्रिकेनं एक गोल करत पुन्हा 3-3 अशी बरोबरी केली. मात्र शेवटच्या क्वार्टरमध्ये वंदनानं आपला तिसरा आणि संघाचा चौथा गोल करत आघाडी मिळवून दिली.