Tokyo Olympic 2020 : ऑलिम्पिकमध्ये लवलिनाला कांस्य पदक, तिसरं पदक मिळवणारी लवलिना 'माझा'वरABP Majha
संदीप चव्हाण
Updated at:
04 Aug 2021 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTokyo Olympics 2020 LIVE Lovlina Borgohain : महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं. आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळालं नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.