Olympic 2020 : ऑलिम्पिकमध्ये P V Sindhu ची विजयी घोडदौड सुरू, उपांत्यपूर्व फेरीत दाखल ABP Majha
बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू कडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत. सिंधूनं आज टोकियो ऑलिम्पिकमधील आपला सलग तिसरा सामना जिंकला आहे. डेन्मार्कच्या मियाचा पराभव करत सिंधूनं क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे. सिंधूनं राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सिंधूनं डेन्मार्कच्या मियाचा एकतर्फी परभाव करत विजय मिळवला. पीव्ही सिंधूनं 21-15 आणि 21-13 अशा फरकानं राउंड ऑफ 16चा सामना आपल्या खिशात घातला आहे. पीव्ही सिंधूनं क्वॉर्टर फायन्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे.
पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये आपली उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. राउंड ऑफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला. पीव्ही सिंधूनं पहिला गेम 21-15 नं आपल्या नावे केला. अशातच दुसरा सामनाही सिंधूनं 21-13 अशा फरकानं जिंकत सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात सिंधूनं मिया ब्लिचफेल्टचा सहज पराभव केला. सिंधूनं दोन सेटमध्येच मियाचं आव्हान संपुष्टात आणलं. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह सिंधूनं पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे.